मैत्र

मैत्री
तुझ्या माझ्या नात्याला नाव हवे कशाला
निरागस मैत्र आपले समजेल कसे जगाला
    तुझ्या व्यथेने यावे माझ्या डोळ्यात पाणी
    माझ्या सुरावटींची तुझ्या ओठावर गाणी
तुझ्या सर्व दुःखात व्हावे मी सहभागी
माझ्या उत्सवात असावे तु अग्रभागी
     व्हावे माझ्या आनंदाने तु सलीलनयना
     माझ्या डोळ्यात पाणी ठेच लागता तुला
बंधन विसरून अंतराचे साद तु द्यावी
मोहपाश सर्व तोडून मी धाव घ्यावी
     वर्षातील एक दिवस पुरेल का या मैत्रीला
     कच्चे धागे फ्रेंडशिपचे हवे आहेत कशाला
अलौकिक मैत्रीचे स्नेहधागे गुंफावे
कृष्णसुदाम्याचे स्वर्गीय मैत्र स्मरावे
     विसरुन सारे ऋणानुबंध मैत्र असे जोडावे
     जीवनाच्या वाळवंटात तु हिरवळ व्हावे


मानसी दीक्षित

Comments

Popular posts from this blog

प्रज्ञाभारती वर्णेकरवर्यः

जगद्गुरुः आदिशङ्कराचार्यः

अपयशाकडे बघण्याचा दृष्टीकोण