Posts

Showing posts from August, 2020

अपयशाकडे बघण्याचा दृष्टीकोण

 अपयशाकडे बघण्याचा दृष्टीकोण नमस्कार!.  जीवनाला आपण प्रवास म्हणतो. प्रवास म्हणजे त्यामध्ये खाचखळगे चढ-उतार आलेच. ते पार करूनच आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचायचे असते. त्यातील खाचखळगे हेच यशापयशाचे प्रतीक आहे. जीवनात देखील पूर्ण यशस्वी माणूस सुद्धा कधी न कधी अपयशी झालेला असतोच. फक्त अपयशाचे गोडवे आपण गात नाहीत. नेहमी पोवाडे यशाचेच गायले जातात. त्यामुळे अपयशाला सर्वजण घाबरतात कारण अपयशाचा सामना कसा करायचा हे आपल्याला शिकवल्या जात नाही. पण आयुष्यामध्ये अपयशाला मागे टाकून पुढे जाणे याची शिकवण अतिशय आवश्यक आहे.  एडिसनने बल्बचा शोध लावला त्यासाठी त्याच्या यशाचे गीत गायले जाते पण बल्ब चा शोध 99 वेळेला चुकल्यानंतर शंभराव्या वेळेला यशस्वी झाला हे मात्र फार सांगितले जात नाही. बरेचदा प्रसिद्ध आणि यशस्वी माणसांच्या अपयशाचे देखील भांडवल केले जाते किंवा त्यांचे अपयश देखील सोनेरी किनार घेऊन झगमगत येते. पण सामान्य माणसाचे अपयश वारंवार त्याला तू किती नालायक आहेस हे सांगून अधोरेखित केले जाते. आणि तिथूनच त्या मनुष्याचा अधोगतीचा प्रवास सुरु होतो त्यामुळे कुठल्याही अपयशी मनुष्याच्य...

कोऽहम्

  कोऽहम् ? आपल्याला कोणीही आपण कोण असा प्रश्न विचारला तर आपण लगेच आपले नाव, काही विशेष नाते,व्यवसाय इत्यादि सांगतो. ही ओळख जन्मापासून मृत्यपर्यंत आपल्या सोबत असते.मृत्युनंतरही आपली हीच ओळख कायम असते. पण खरंच आपली तेवढीच ओळख आहे का? आपल्यासारखी सामान्य माणसे म्हणतील अर्थातच! तीच तर खरी आहे. पण संत म्हणतात ही तर देहाची ओळख आहे. देहगत जे अंगुष्ठमात्र चैतन्य आहे तो आपला खरा परिचय!  भौतिक जगातील आपली ओळख ही देहाची आहे. पण मग अस काय आहे जे निघून गेले तर देह निष्प्राण होतो? ती चेतना ,तो परमात्मांश ही माझी ओळख आहे. भवसागराच्या रामरगाड्यात कोऽहम् ? हा प्रश्न पडायला देखील वेळ नसतो आणि पडलाच तर त्यावेळेची आपली ओळख आठवून आपण पुढे चालतो.  तत्त्वमसि। व अहं ब्रह्मास्मि। ही महावाक्ये कोऽहम् या प्रश्नाचे उत्तर देतात. तु तोच आहेस. पण तो म्हणजे कोण? कुठे असतो?कसा दिसतो?कारण प्रत्येक गोष्टीची खात्री आपण भौतिक निकषांवर करत असतो. त्यामुळे पंचतन्मात्रांच्या कोणत्या स्वरुपात तो आहे?  शब्द स्पर्श रूप रस गंध या आपल्या ज्ञानेंद्रियांचा विषय तो आहे का? तो म्हणजे मी आहे का? पण आपल्यामध्ये असलेले...